‘ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन’; राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राज्य सरकारवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अगोदरच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यात आता राज्य सरकारवर राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या 36 वसतिगृहाच्या मुद्यांवरून निशाणा साधला आहे. तर महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन असल्याची टीका केली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, 2018 मध्ये ओबीसींसाठी 36 वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतची तशी घोषणा ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी केली होती. राज्य सरकारकडून सध्या ओबीसी समाजाची फसवणूक केली जात आहे. हे सरकार ओबीसींच्या बाबतीत नुसते आश्वासन देण्याचे काम करीत आहे

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना तायवाडे म्हणाले कि, सध्या सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत ओबीसी समाजाच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. या दोन वर्षात ओबीसी समाजा बांधवांना राज्य सरकारकडून काहीही देण्यात आलेले नाही. येत्या एक महिन्यात जर ओबीसींचे वसतीगृह उभे न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने यावेळी देण्यात आला.

Leave a Comment