National Pension Scheme: सरकार वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी योजना आणत असते. आता सरकारने अशी योजना आणली आहे, ज्यामध्ये नोकरी नसलेल्यांना देखील वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. सरकारची ही योजना स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आहे. या योजनेचे नाव नॅशनल पेन्शन स्कीम आहे. सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते. कसे? तर जाणून घेऊया सविस्तर…
नॅशनल पेन्शन योजना म्हणजे काय?
ही योजना दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला निवृत्तीनंतर नियमित पेन्शनचा लाभ मिळेल. ही योजना केंद्र सरकार चालवते. यामध्ये सरकार तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मोठा रिटायरमेंट फंड देते.
अर्ज कसा करायचा – (National Pension Scheme)
यासाठी तुम्हाला बँकेत तुमचे खाते उघडावे लागेल. तुम्ही हे तुमच्या नावाने तसेच तुमच्या पार्टनरच्या नावाने उघडू शकता. यामध्ये, 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला एकत्र किंवा दर महिन्याला पेन्शन म्हणून पैसे मिळतात.
या योजनेत कोण सहभागी होऊ शकतो?
सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
किती गुंतवणूक करायची –
तुम्हाला या योजनेत दरमहा किंवा वार्षिक गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही दरमहा 1000 रुपये देखील गुंतवू शकता. ही योजना तुम्ही वयाच्या 70 वर्षापर्यंत चालवू शकता. यामध्ये तुम्ही 60 वर्षांनंतर 60% पैसे काढू शकता.
जर तुम्ही वयाच्या 30 वर्षांनंतर या योजनेत गुंतवणूक केली आणि दरमहा 5 हजार रुपये गुंतवले, तर वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला जवळपास 1.12 कोटी रुपये मिळाले असतील. तुम्हाला दर महिन्याला गुंतवणुकीवर 10% रिटर्न मिळतो. वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्ही एकाच वेळी 60% पैसे काढू शकता. याशिवाय तुम्हाला दरमहा 45 हजार रुपये पेन्शन मिळेल.
कर लाभ –
नॅशनल पेन्शन स्कीममध्ये (National Pension Scheme) तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो. तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80(C) व्यतिरिक्त कलम 80CD(1B) अंतर्गत हा लाभ घेऊ शकता.