देशव्यापी बंद : कराड शहर चारचाकी हातगाडा व हॉकर्स संघटनेचा पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

हॉकर्स धारकांच्या प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी नॅशनल फेडरेशन व महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या वतीने देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी कराड शहर चारचाकी हातगाडा हॉकर्स संघटनेने कराड येथील तहसीलदार विजय पवार यांना निवेदन दिले.

आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी नॅशनल फेडरेशन ऑफ महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन यांच्या वतीने देशव्यापी बंद पुकारला आहे. देशभरात अनेक नगरपालिकांकडून हॉकर्ससाठी केलेले नियम व त्याची पूर्तता झालेली नाही, ती लवकर अमंलात यावी. यासह प्रमुख चार मागण्यांसाठी आज बंद पुकारण्यात आला आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर अध्यक्ष जावेद नायकवडी, उपाध्यक्ष सतीश तावरे, सचिव हरीश बल्लाळ, खजिनदार गजानन कुंभार, संघटक अशपाक मुल्ला यांची नावे आहेत.

कराड शहर चारचाकी हातगाडा हॉकर्स संघटनेने दिलेल्या निवेदनात प्रमुख चार मागण्या करण्यात आले आहेत. यामध्ये पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमयन कायदा 2014ची चोख अंमलबजावणी झाली पाहिजे. पथविक्रेता योजना राज्य सरकारने त्वरित घोषित करून ऑर्डर पास करावी. विक्री प्रमाणपत्र मिळावे आणि कोणतेही पथविक्रेत्यास पथविक्रेते कायद्याचे पालन न करता विस्थापित करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment