वृत्तसंस्था | कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही मंगळवारी संध्याकाळी देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली. आता देशातील सर्व टोलनाक्यावरील टोलवसून तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहेत.
In view of #COVID19, it has been ordered to temporarily suspend the collection of toll at all toll plaza across India. This will not only reduce inconvenience to the supply of emergency services but also save critical time: Nitin Gadkari, Minister of Road Transport & Highways pic.twitter.com/aytv1owWX4
— ANI (@ANI) March 25, 2020
टोलनाक्यावर कॅशमध्ये पैसे द्यावे लागत असल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची जास्त भिती आहे. वेगवेगळ्या भागांतून आलेल्या लोकांच्या हातातून आलेले पैशांचे मोठ्या प्रमाणावर हस्तांतरण होत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. टोलनाक्यावर काम करणार्या कर्मचार्यांच्याही आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
In view of Covid-19, it has been ordered to temporarily suspend the collection of toll at all toll plaza across India. This will not only reduce inconvenience to the supply of emergency services but also save critical time. #IndiaFightsCorona
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 25, 2020
दरम्यान, देशात आत्तापर्यंत एकुण ५०० हून अधिक पोझिटिव्ह कोरोनारुग्ण सापडले आहेत. यातील १२२ रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्न मुंबई मध्ये सापडले आहेत. देश सध्या कोरोनाच्या दुसर्या स्टेजमध्ये आहे. मात्र योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आपल्याला तिसर्या स्टेजमध्ये जाण्यास जास्त वेळ लागणार नाही. तेव्हा सर्वांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
मोठी बातमी! गोरगरीब जनता, कामगारांसाठी सरकारची १ लाख ७० हजार कोटींची घोषणा
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या