मुंबई प्रतिनिधी । सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द करत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. आलोक वर्मा यांना हटवण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी विद्यमान सरकार टीका केली आहे.
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटवण्याआधी निवड समितीची परवानगी घ्यायला हवी होती. ज्या पद्धतीने सीव्हीसीने आलोक वर्मा यांना हटवले, ते संविधानाच्या विरोधात आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द केला आहे. वर्मा यांना हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, हा निर्णय कोर्टाने रद्द करुन मोदी सरकारला एक चपराक लावली आहे.
त्याचप्रमाणे धोरणात्मक निर्णय हा वेगळा विषय आहे. पण ज्या केसेस आलोक वर्मा हाताळत होते त्याचे सर्व अधिकार हे त्यांच्याकडेच आहेत. त्या केसेसमध्ये अनेक मोठे अधिकारी व मोठ्या मंत्र्यांची नावे आहेत. राफेल सारखे प्रकरण त्यांच्या हातात होते. त्या सर्व प्रकरणात ते योग्य निर्णय घेतील असा लोकांना विश्वास आहे, असेही मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?