हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Navi Mumbai Airport। नवी मुंबईतील विमानतळाचे काम पूर्ण होत आले आहे. आता लवकरच हे विमानतळ कार्यान्वित होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मुंबईत विमानतळ प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विमानतळावरील सर्व सुविधांची थोडक्यात माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज नवीन मुंबईत विमानतळच्या (Navi Mumbai Airport) प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी आणि शिंदे आलो. आता त्याच्या प्रगतीसाठीचं सादरीकरण पाहिलं. रनवे पासून टर्मिनल बिल्डिंग पर्यंतची प्रगती पाहिली. साधारणपणे याची भौतिक प्रगती ९४ टक्के झाली आहे. रनवे सुसज्जित आहे. टर्मिनल बिल्डिंगचं काम झालं. टर्मिनल बिल्डिंगच्या इंटिरियरचं काम चाललेलं आहे. बाहेरच्या सिलिंगचं काम वेगानं करावं लागणार आहे. बॅगेज हँडलिंगची सिस्टिम आम्ही बघितली . अत्यंत चांगली सिस्टिम आहे. यामध्ये बॅगेचा बारकोड ३६ डिग्रीतून भगता येईल. ती योग्य ठिकाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.
हा ग्रीन एअरपोर्ट – Navi Mumbai Airport
आम्ही ऑथॉरिटीला सांगितलं आहे कि या एअरपोर्टवर (Navi Mumbai Airport) बॅगेज क्लेम ही व्यवस्था ही जगातील फास्टेट व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा पूर्ण एअरपोर्ट होईल तेव्हा दोन रनवे या क्षमतेने ९ कोटी प्रवाशांसाठी नवी मुंबई एअरपोर्ट सुसज्ज होणार आहे. मुंबईच्या सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट पेक्षा बराच मोठा एअरपोर्ट होणार आहे. याची वैशिट्य म्हणजे हा ग्रीन एअरपोर्ट आहे. ३७ मेगावॅट ग्रीन वीज वापरली जाणार आहे. याठिकाणी EV अल्टरनेट फ्यूलची वाहने असणार आहे. साष्टनेबल एव्हिएशन फ्युल जे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे त्याचेही केंद्र हे नवी मुंबई विमानतळ असणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण एअरपोर्ट ला जोडलेली आहे. अटल सेतूवरून कोस्टल रोडचे काम चाललं आहे. हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ठाण्यावरून थेट रस्ता बनवण्याचे काम आम्ही लवकरच सुरु करणार आहोत. चारी दिशांनी याठिकाणी येण्याकरता आपण व्यवस्था करत आहोत. मेट्रो, रेल्वे, वॉटर, ट्रान्सपोर्ट अशी मोठी कनेक्टिव्हीटी केली जाणार आहे. ज्यामुळे प्रवाशी या विमानतळावर लवकरात लवकर पोचतील असेही फडणवीसांनी सांगितलं.




