हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याचा आग्रह धरला आहे तर, ठाकरे सरकार कडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घाट घातला जात आहे.या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज यांनी त्यांची भूमिका जाहीर केली.
नवी मुंबईत होणारं विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्स्टेन्शन आहे. मुंबईत विमानतळाला असलेली जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि देशांतर्गत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळालादेखील शिवरायांचंच नाव दिलं जावं,’ असं राज ठाकरे म्हणाले.
विमानतळांचं नामकरण करण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आदरणीय आहेत. दि. बा. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. दोन्ही नेत्यांच्या मोठेपणाबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव योग्य वाटतं,’ असं ते म्हणाले