.. म्हणून भल्या पहाटे ४ वाजता रोहित पवार पोहोचले APMC मार्केटमध्ये; दिलं ‘हे’ आश्वासन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई । आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी आज पहाटे चार वाजता अचानक नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) भेट दिली. पहाटे ते बाजार समितीतल्या भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये दाखल झाले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीदरम्यान रोहित यांनी मार्केटमधील व्यापारी व माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.

याशिवाय मार्केटमधल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी त्यांनी बातचीत केली. ‘शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. शेतकरी कायदे व शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची आहे. पण राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल,’ अशी ग्वाही रोहित पवार यांनी यावेळी दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली. ‘ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. उद्या कदाचित मलाही नोटीस येईल,’ असं ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment