कपिलच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा ‘ठोको ताली’ म्हणताना दिसणार; व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। ‘द कपिल शर्मा शोची’ एकेकाळी जान असणारे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा या शोमध्ये दिसणार आहेत. आपल्या आक्षेपार्ह्य विधानामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने सोनी चॅनलने त्यांना शोमधून काढून टाकलं होतं. मात्र आता सिद्धू पुन्हा एकदा ठोको ताली म्हणत आपल्याला कपिलच्या शोमध्ये दिसणार आहेत. या गोष्टीची पुष्टी करणारा सेटवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने नुकतीच या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती. शूटिंग दरम्यान तिने ‘बूमरँग व्हिडीओ’ शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिच्यासोबत सिद्धूंच्या लूकमधील एक व्यक्ती पाहायला मिळतेय. पिवळ्या रंगाची पगडी आणि निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून कपिल शर्माच आहे. नवज्योत सिंग सिद्धूंच्या लूकमधला कपिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला पाहून सिद्धूच सेटवर परतल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

 

Leave a Comment