अमरावती । प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अमरावती मतदारसंघातील युवा स्वाभिमानी पक्षाच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. गेली पाच वर्षे मी लोकांची कामे केली आहेत. लोकांनी मला दिलेले प्रेम आणि आशीर्वाद यांच्या जोरावर मी हि निवडणूक जिंकेल असे नवनीत राणा यांनी आपल्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी म्हणाले आहे.
पाच वर्षे मी लोकांच्या प्रश्नासाठी लढा देण्याचे काम केले आहे. आता शेवटचे तेरा दिवस राहिले आहेत. या १३ दिवसात जय पराजय ठरणार आहे. तो जय पराजय तुम्ही केलेल्या कामावर ठरणार आहे असे असे नवनीत राणा कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या आहेत.
आमदार रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा या युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीने पाठींबा दिला आहे. तसेच त्यांचा सामना विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या सोबत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.