गणपतीची मूर्ती उंचावरून फेकून विसर्जन; नवनीत राणांवर टिकेची झोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदा गणेशोत्सव उत्स्फूर्तपणे पार पडला. अनंत चतुर्थीला सर्वांनी अगदी थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत गणरायाचे विसर्जन केले. मात्र त्यातच अमरावती खासदार नवनीत राणा यांचा गणेश विसर्जनाचा व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी चक्क तलावात फेकून देत गणपतीचे विसर्जन केल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता, गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी नवनीत राणांनी बाप्पाला डोक्यावर घेतल. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जोरदार जयघोष केला. मात्र यानंतर त्यांनी मुर्तीला तलावात अक्षरश: फेकून देत गणपतीचे विसर्जन केलं. येवडच नव्हे तर ज्या पाण्यात राणा दाम्पत्याने बाप्पाचं विसर्जन केलं, ते पाणी खूपच अस्वच्छ होतं, गढूळ होतं. नवनीत राणांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

या व्हिडिओ नंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. नवनीत राणा यांनी धर्माच्या नावावर सुरू केलेला आक्रास्ताळेपणा बंद करावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. नवनीत राणा या हिंदुत्वासाठी सातत्याने त्या गोंधळ घालतात. नवनीत जी आपण हनुमान चालीसासाठी थयथयाट केला परंतु आपल्याला साधी हनुमान चालीसा ही म्हणता येत नाही ? बाप्पाचे विसर्जन कसे करतात, याची आपल्याला साधी पद्धत आणि संस्कार माहीत असू नयेत आणि आपण स्वतःला हिंदू म्हणवता? असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर केला.