देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री; नवनीत राणा यांचे मोठे विधान

0
192
Devendra Fadnavis Navneet Rana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आणि आमचे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. यात काडीमात्र शंका नाही, असे मोठे विधान खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावती येथे केले. त्याच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्यात नवनीत राणा यांनी भाषण केले. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यातून गोवा, गोव्यातून गुजरात. जिथं जिथं देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल पडलं, तिथ तिथं न्यायासाठी लढणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहेत.

देवेंद्र फडणवीस सर्वांना आपण उपमुख्यमंत्री वाटता. पण, आमची सर्वांची इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आपणच आहात. आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात, आडोसे नवनीत राणा यांनी म्हंटले आहे. राणा यांच्या वक्तव्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जातेय हे पाहावे लागणार आहे.