नवनीत राणांनी चक्क साडीमध्ये जिंकली रनिंग स्पर्धा; काॅलेज तरुणींना लाजवेल असा वेग

अमरावती : एकेकाळी आपल्या ठुमक्यांनी चित्रपटसृष्टी गाजवणार्‍या नवणीत राणा यांनी पाहता पाहता लोकसभा गाजवायला सुरवात केलीय. अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेल्या राणा यांनी राजकारणात स्वत:चा चांगला दबदबा तयार केलाय. फेमस अभिनेत्री ते खासदार असा प्रवास केलेल्या राणा या नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. होय. आजही त्यांनी असंच एक कृत्य करुन सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय.

एका धावण्याच्या स्पर्धेय चक्क साडीमध्ये रनिंग करुन राणा यांनी पहिला नंबर काढलाय. राणा यांना पळताना पाहून अनेकांना विश्वास बसणार नाही. साडीमध्ये कोणी इतक्या वेगाने सहसा धावू शकत नाही. मात्र राणा यांचा फिटनेस यामुळे दिसून आलाय.

खासदार म्हटल्यावर राजकारण, गाठी भेटी..दौरे..बैठका..सभा हे रोजंच. यातून स्वत: साठी, व्यायामासाठी वेळ काढणं मुश्किल. मात्र नवणीत राणा हे सगळं करुन आपल्या फिटनेसकडंही लक्ष देतात. अन् त्यामुळे काॅलेजच्या तरुणींनाही जमणार नाही इतक्या वेगाने राणा धावू शकलेत. राणा यांचा धावतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होतोय.

तीन राऊंड करुनही राणा यांना दम न लागल्यानं त्यांचा रोज धावण्याचा सराव असल्याचं दिसून येतंय. मागेही एकदा राणा यांचा सायकलींग करतानाचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता.

राजस्थानी हितकारक महिला मंडळाचे वतीने आज २६ डिसेंबर रविवार रोजी अमरावती शहरातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रांगणात महिलांसोबत धावल्या. यावेळी, महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम राहण्यासाठी वेळातून वेळ काढून व्यायाम करावा व स्वतःला सुदृढ ठेवावे असे मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले.

राजस्थानी हितकारक महिला मंडळाने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे राणा यांनी कौतुक केले. महिला आता सर्व क्षेत्रात अग्रेसर असून चूल व मूल यापलीकडे जाऊन महिलांनी स्वतःला सिद्ध केल्याचे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी म्हटले.

या कार्यक्रमाचे आयोजन उर्मिला कलंत्री, रेशु खंडेलवाल, राधिका अटल, मनीषा अग्रवाल, शीतल ओझा, सोनाली राठी, नेहा जैन, शिवानी शर्मा, पूजा जोशी , राधिका खेतान आदींसह राजस्थानी महिला हितकारक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.