नक्षलवाद्यांनीच केली जखमी जवानाला मलमपट्टी..जवानाला नक्षलवाद्यांच्या कॅम्पमधून घेऊन येणाऱ्या पत्रकारांनी सांगितला थरारक अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बस्तर | कोब्रा कमांडो राकेश्वर सिंह मन्हास यांची नक्सलवाद्यानी आज बेशर्थ सुटका केली आहे. सदर जवानाला 3 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी पकडल्याचे बोलले जात होते. सहा दिवस नक्सलवाद्यांच्या ताब्यात राहिल्यानंतर आज कमांडोची सुटका केली गेली. पद्मश्री धर्मपाल सैनी यांच्या उपस्थितीमध्ये जवानाला काहीही त्रास न देता सोडण्यात आले. सुटका केल्यानंतर जवानाला सी आर पी एफ कॅम्प मध्ये पोहच केले गेले. यावेळी नक्षलवाद्यांच्या कॅम्पमधून जवानाला घेऊन येणाऱ्या पत्रकारांनी त्यांचा थरारक अनुभव सांगितला आहे. यावेळी जंगलात भरकटलेला जखमी जवान नक्षलवाद्यांच्या हाती लागला. जखमी अवस्थेतिल जवानाला नक्षलवाद्यांनीच मलमपट्टी केली अशी माहिती एका पत्रकाराने दिली आहे. याबाबत एनआयए या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

जवानाची सुटका करण्यासाठी 11 सदस्सिय टीम पोहचली होती. सोबतच बस्तर येथील जवळपास 7 पत्रकार उपस्थित होते. जवानाच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावर नक्सलवाद्यानी उपचार केले. व माणुसकीच्या नात्याने त्यांनी जवानाची सुटका करत असल्याचे पत्रकारांना सांगितले. जवानाची मानसिक अवस्था खालावत चालली असल्याचेही त्यांनी माध्यमांना कळवले होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/760512057800020

नक्सलवाद्यानी सुटका केल्यानंतर जवान राजेश्वर मनहास यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आज त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा दिवस आहे. राजेश्वर यांच्या पत्नीने आनंद व्यक्त केला आणि सरकारचे आभार व्यक्त केले. सरकार आणि नक्सल यांच्यामध्ये चर्चा सुरू होती त्यावेळी वेळोवेळी जवान सुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी ते जवानाचा फोटो पाठवत होते. आज जवानाला 11 लोकांची टीम, 7 पत्रकार आणि गावातील 150 तरुणांच्या समोर जवानाची सुटका करण्यात आली.