Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fixed Deposits : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी Shriram Finance Limited ने देखील ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देत फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Shriram Finance to grow its retail fixed deposits portfolio by 25% |  Business Standard News

1 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू

Shriram Finance Limited च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 1 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. या NBFC मध्ये FD वर 9.36% व्याज मिळवण्याची चांगली संधी आहे. श्रीराम फायनान्सने 12 महिन्यांच्या FD वरील व्याजदर 7 टक्क्यांवरून 30 bps ने वाढवून 7.30 टक्के तर 18 महिन्यांच्या FD वरील व्याजदर 7.30 टक्क्यांवरून 20 bps ने वाढवून 7.50 टक्क्यांवर आणले. Fixed Deposits

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Fixed Deposits

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Fixed Deposits

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/fixed-deposit/shriram-city-fixed-deposit-rate.html

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये