व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीचा मोहिते पाटील गटाला दणका, ६ जि.प. सदस्यांची पक्षातून हकालपट्टी

सोलापूर प्रतिनिधी | भाजप सोबत जवळीक साधणार्‍या मोहिते पाटील गटाला राष्ट्रवादीने दणका दिला आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीमध्ये भाजपला मतदान करणार्‍या मोहिते पाटील गटातील सहा जि.प. सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहा जि.प. सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. सदर सहा जि.प. सदस्य हे मोहिते पाटील गटातील होते. पक्षाने दिलेले आदेश धुडकावून मतदान केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी ही कारवाई केली आहे. सुनंदा फुले, शितल देवी, स्वरुपा राणी, मंगल वाघमोडे, अरुणा तोडकर, गणेश पाटील अशी कारवाई झालेल्या जि.प. सदस्यांची नावे आहेत.

मोहिते पाटील कुटूंबातील दोघांचं निलंबन

राष्ट्रवादीच्या तेवीस सदस्यांपैकी सहा सदस्य मोहिते पाटील गटातील होते. राष्ट्रवादीच्या या सदस्यांतील दोन सदस्य मोहिते पाटील कुटुंबातील होते. पक्षाने केलेल्या कारवाईमुळे मोहिते पाटील गटाला जबर धक्का बसल्याचे बोलले जात आहे.