हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्यास काय फायदा होतो हे या निवडणुकीमधून दिसून आल्याचं म्हटलं. तसेच अजित पवारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आम्ही एकटं यायचं की आघाडी करून यायचं हे आमचे वरिष्ठ ठरवतील असं उत्तरही दिलं, तसेच यांनी बिनकामाचा सल्ला देण्याचं काही कारण नाही असेही अजित पवार यांनी म्हंटल.
चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील पक्षांनी एक-एकटं लढावं असं वक्तव्य केल्याचं सांगत पत्रकारांनी यावर अजित पवार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना आम्ही कसंही येऊ कोणी बिनकामाचा सल्ला देण्याची गरज नाही अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं. “हे बघा आम्ही एकटं यायाचं की आघाडी करुन यायचं ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. यांनी कोणी बिनकामाचा सल्ला देण्याचं काही कारण नाही,” असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला
माझ्यासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला एवढा दारुण पराभव का झाला याचं चिंतन करुन वगैरे वगैरे. पण तो देखील दिलदारपणा दाखवण्याची दानत त्यांच्या लोकांची नाही अस अजित दादा म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’