हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर असून पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान कासेगावं येथील सभेत अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी करत गोपीचंद पडळकर आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच आपल्या मागे चुलता उभा आहे आणि शेवटपर्यंत पाठीशी राहणार आहे असेही अजित पवार यांनी म्हंटल.
सध्या एक नेता तुमच्याकडे जोरदार भाषणे करीत फिरतोय, त्याचे डिपॉझिट सुद्धा त्याला बारामतीमध्ये वाचवता आले नव्हते आणि आता हा कोणाच्या तोंडाने मते मागतोय. ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आले नाही तो तुम्हाला सल्ले देतोय असे म्हणत धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडवली.
तर ज्याला दोनवेळा आमच्या दत्तामामाने पाडले तो आता मते मागायला आलाय. हा मोठा पुढारी, उंच पुरा आणि अनेक वर्षे मंत्री राहिलेला असे हर्षवर्धन पाटील यांचे वर्णन करीत टोलेबाजी केली. वीस वीस वर्षे मंत्री असूनही तुमच्या लोकांचीही कामे केली नाहीत म्हणून तुम्हाला तुमच्या घराच्या लोकांनी पाडले आणि आता बाहेर जाऊन तुम्ही काय सांगणार कोणाला मत द्या ते असे म्हणत हर्षवर्धन पाटलांना लक्ष केले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group