हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधान परिषद निवडणूकी साठी भाजपने 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्यामुळे चर्चाना उधाण आले. याच पार्श्वभूमी वर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात फडणवीसांचेच षडयंत्र आहे अस त्यांनी म्हंटल.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, पूर्वीच्या काळात भाजपा वाढवण्यासाठी ज्यांनी जिवाचं रान केलं त्या गोपीनाथ मुडेंची कन्या पंकजा मुंडे यांचा जाणीवपूर्वकपणे विधान परिषद निवडणुकीमधून पत्ता कट केला. हे सर्व षड्यंत्र देवेंद्र फडणवीसांचं आहे, यावरून हे सिद्ध होते की, देवेंद्र फडणवीस हे हुकूमशहा आहेत असं मिटकरी म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजपकडून विधान परिषदेसाठी राम शिंदे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, आणि , भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारी साठी आम्ही खूप प्रयत्न केले मात्र पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला पंकजाताईंना वेगळी काही जबाबदारी सोपवायची असेल. यामुळे त्यांना उमेदवारी दिली नसावी असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.