हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं आहे. दरम्यान, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून ज्या चुकीच्या पद्धतीने अटक केली त्याबद्दल मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. असे ट्वीट करत अमोल मिटकरी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
माजी गृहमंत्री श्री अनिल जी देशमुख साहेब यांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून ज्या चुकीच्या पद्धतीने अटक केली त्याबद्दल मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.#केंद्रासरकार निषेध@AmitShah@PMOIndia@aajtak @ndtvindia @ABPNews
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 2, 2021
चुकीला माफी नाही- चंद्रकांत पाटील
दरम्यान, चुकीला माफी नाही अस म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, देशमुखांच्या बाबतीत शेवटी हे व्हायच तेच झालं. ईडीने अनेक वेळा समन्स देऊनही ते हजर राहिले नाही. ईडीने त्यांना पुरासा वेळ दिला. आता ईडीने अटकेची कारवाई केलीय. ईडी त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे. शेवटी चुकीला माफी नाही. कुणाचीही चुक माफ केली जाणार नाही, असं नरेंद्र मोदींनी 2014 ला सांगितलं होतं.