हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील ठाकरे सरकार वर टीका केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची स्तुती केली होती. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणाने बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली असे त्यांनी म्हंटल. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हंटल की, चंद्रकांत पाटील म्हणतात राज बोलले बाळासाहेब आठवले. परंतु, बाळासाहेबांचे पुत्र विधानसभेत गरजले तेव्हाच तुम्हाला प्रबोधनकार व बाळासाहेब दोन्ही आठवले असतील. ज्यामुळे तुमची अवस्था ‘‘मळमळतय मी तळमळतय मी’’ अशी झाली असून, आता धोती योग घेतल्याशिवाय पर्याय नाही.
चंद्रकांत पाटील म्हणतात राज बोलले बाळासाहेब आठवले.. पण बाळासाहेबांचे पुत्र विधानसभेत गरजले तेंव्हाच तुम्हाला प्रबोधनकार व बाळासाहेब दोन्ही आठवले असतील ज्यामुळे तुमची अवस्था "मळमळतय मी तळमळतय मी " अशी झाली असुन आता धोती योग घेतल्याशिवाय पर्याय नाही . pic.twitter.com/3W6Lsb4uKM
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 3, 2022
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले-
राज ठाकरे यांचे शनिवारी झालेले भाषण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आठवण करुन देणारे होते. राज ठाकरे यांच्या भाषणाने सामान्य हिंदूना समाधान वाटले असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचे राजकारण वाढले या वक्तव्यावर आपण २०० टक्के सहमत आहोत असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.