चंद्रकांत पाटलांना स्वघराचा थांगपत्ता नाही ; जयंत पाटील यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू अस वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून देखील पाटलांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांचा जोरदार समाचार घेत त्यांना स्वघराचा थांगपत्ता नाही असं म्हंटल आहे.

“जिवलगा राहिले रे दुर घर माझे l पाऊल थकले, (माथ्यावरचे) जड झाले ओझे ll शांता शेळके यांच्या गिताची यानिमित्ताने आठवण झाली .स्वघराचा थांग पत्ता नसलेल्या चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटील साहेबांना घरी पाठवण्याचे भाष्य त्यांच्या डोक्यावर ओझे जड झाल्याचे दर्शविते. अस ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते –

इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल होत की 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू. राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे बोलण्याचा परमेश्वराने एक आशिर्वाद दिलाय. पण कार्यकर्ते बरोबर असतील 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू. जर आपण आपल्यात एकजुट ठेवली असती तर ते या निवडणुकीत देखील शक्य होतं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण एकजुटीने काम करु.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.