हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केलं. भाजपने एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीस याना उपमुख्यमंत्री पद मिळाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना लक्ष केलंय. देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय असा टोला त्यांनी लगावला आहे.
आषाडी एकादशीला शासकीय पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सरकार राहणार की नाही, हा प्रश्न आहे, कारण सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीतं ते आमदार अपात्र ठरल्यास, मग सर्व काही समोर येणार आहे . मात्र देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय आहे असा चिमटा मिटकरी यांनी काढला आहे.
यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पायही यांच्यावरही निशाणा साधला. हे सरकार नेमकं आहे कोणाचं आहे. भाजपचे अकि सेनेचे आहे?? भाजपचं असेल तर मुख्यमंत्री फडणवीस का नाही, नसेल तर शिवसेनेचं आहे हे स्वीकारा असे अमोल मिटकरी यांनी म्हंटल.