राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक; शरद पवारांच्या मनात नेमकं काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने अक्षरशः हाहाकार केला असून अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजाला धीर देण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 6 ऑक्टोबर ला ही बैठक होणार आहे.

या बैठकीत पावसामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील माहिती शरद पवार घेतील. कोणत्या विभागात किती नुकसान झालंय, पंचनामे झालेत का?, मदतीसंदर्भात काय करता येईल, याची चर्चा या बैठकीत होणे अपेक्षित आहे. तसंच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना त्या-त्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात दौरा करण्याच्या सूचना देखील पवार देण्याची शक्यता आहे.

पहिल्या फळीतील सर्व नेते उपस्थित राहणार-

या बैठकीला राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील सर्व मेटे उपस्थित राहतील. स्वत: शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, संजय बनसोडे यांसह इतरही मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.