Monday, January 30, 2023

वादग्रस्त विधानाचा निषेध; पाथरीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून कृषीमंत्री Abdul Sattar यांच्या पुतळ्याचे दहन

- Advertisement -

पाथरी ता. प्रतिनिधी | राज्याचे कृषिमंत्री Abdul Sattar यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी पाथरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील राष्ट्रवादी भवन समोर अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

राज्याचे कृषिमंत्री Abdul Sattar यांनी सिल्लोड येथील एका सभेच्या आढावा बैठकी दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी अपशब्द वापरले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पाथरी तालुका पदाधिकाऱ्यांनी 07 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मंत्री महोदयांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत जोडे मारले. यावेळी कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री Abdul Sattar यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

- Advertisement -

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मांयदळे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष संदीप टेंगसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख खालेद, तालुकाध्यक्ष विष्णू काळे, आयटी सेल जिल्हाध्यक्ष अमोल भाले पाटील, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अहमद अत्तार, सरपंच वैजनाथ महिपाल, सरपंच श्याम धर्मे, विक्रम गायकवाड, माजी नगरसेवक सतीश वाकडे, उपसरपंच गणेश काळे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. Abdul Sattar

हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा