हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संग्राम जगतापांचा उमेदवारी अर्ज दाखल

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । प्रतिनिधी
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नगरमध्ये आले होते. राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संग्राम जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

संग्राम जगताप यांच्या घरी देवपूजा, औक्षण झाल्यानंतर ते घराबाहेर पडले. ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीचे दर्शन घेऊन शहरातील माळीवडा परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत संग्राम जगताप यांच्यासह अंकुश काकडे, आमदार राहुल जगताप, काँग्रेसचे आमदार सुधीर तांबे आणि जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या रॅलीची सांगता करून संग्राम जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. विशेष म्हणजे संग्राम जगताप याने कुटुंबासोबत नाही तर शेतकरी दाम्पत्याच्या हाताने उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्या विरोधात भाजपच्या डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीची लढत रंगणार आहे. पवार आणि विखे घराण्याच्या वादात हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर सुजय विखे पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना ठसलं देण्यासाठी तरुण चेहरा असलेल्या संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता दोघांमध्ये लढत होत आहे.