राजेश विटेकरांचा प्रत्यक्ष गाठीभेटींच्या प्रचारावर भर 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी |प्रतिनिधी 

परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश  विटेकर यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला आहे. तर जनता आपल्या पाठीशी असल्याचे म्हणत त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. राजेश विटेकारांनी आज गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉ. मधुसुधन केंद्रे देखील उपस्थित होते.

परभणी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांनी शिवसेनेपुढे तगडे आव्हान उभा केले आहे. या ठिकाणी त्यांचा सामना शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याशी होणार आहे. मात्र  सध्या तरी राजेश विटेकारांचे पारडे जड असल्याचे मतदारसंघात बोलले जाते आहे.  

राजेश विटेकर यांनी  सोनपेठ तालुक्यातील विटे गावाच्या सरपंच  पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. ते सलग १५ वर्षे  सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. तसेच परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देखील भूषवले आहे. येत्या १८ एप्रिल परभणी मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. म्हणून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराची लगबग वाढवली आहे.

 

Leave a Comment