तुझा लवकरच दाभोळकर होणार, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून एका व्यक्तीने ही धमकी दिली असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवारांना धमकी देण्यात आल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. पोलीस आयुक्तांना भेटून त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असे नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.