कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं; पवारांनी केला उद्धव ठाकरेंचा बचाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री बाहेर जात नाहीत असा आरोप विरोधकांकडून त्यांच्यावर करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कुठेही जाण्याची गरज नाही. कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नसल्याचा विरोधक त्यांच्यावर आरोप करत त्यावर तुमचं मत काय, असा प्रश्न पवार यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “मला लोकांमध्ये जाण्याची आवड आहे. मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. त्यामुळेच मला राहावत नाही म्हणून मी संकटकाळातही बाहेर जात असतो,” असं पवार यावेळी म्हणाले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी कुठेही जाण्याची गरज नाही. कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं,” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. तसंच मुंबईत आल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण डोंबिवली अशी काही ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक असली तरी परिस्थितीत सुधारणा होत आहे. महाराष्ट्रात मुंबईपेक्षाही चिंताजानक स्थिती ही डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. पावसाळ्याच्या दृष्टीने आणखी काळजी घेण्याची गरज आहे. स्थानिक जनतेनं संकटकाळात मदत केली. सर्व समाजाचं आम्हाला सहकार्य मिळालं,” असंही पवार यांनी यावेळी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”