तुम्ही मोदींना नव्हे श्रीरामाला विरोध करताय; उमा भारतींची शरद पवारांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी मोदी सरकारकडून सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी टिप्पणी केल्यानं आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ‘मंदिर बांधून कोरोना जाईल असं काहींना वाटतंय’ या शरद पवारांच्या विधानावर भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी सोमवारी संताप व्यक्त केला. शरद पवार यांनी राम मंदिरासंदर्भात केलेले वक्तव्य हे मोदी विरोधी नव्हे तर श्रीरामाच्या विरोधात आहे, असा आरोप उमा भारती यांनी केला. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून कालच शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. मंदिर बांधून कोरोना बरा होत नाही, असे पवारांना सुचवायचे असेल तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी पंढरपुरला जाऊन कोरोना नष्ट कर, असे साकडे विठ्ठलाला का घातले, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला होता.

काय म्हणाले होते शरद पवार?
कोरोनामुळं जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करतोय. त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतोय. काहींना वाटतंय मंदिर बांधून कोरोना जाईल, म्हणून त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा, असे पवार यांनी म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment