सांगली जिल्ह्यात महाआघाडीची मुसंडी !!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

विधानसभा निवडणुकीचे आज निकाल लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने निकालात मुसंडी मारलेली आहे. सांगली जिल्ह्याचा विचार करता महाआघाडीने ८ जांगांपैकी ५ जागांवर विजय मिळवलेला आहे. तर भाजप-शिवसेना युतीला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

जिल्ह्यातील सर्वात चर्चेची पलूस विधानसभेची जागा विश्वजित कदम यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे. विश्वजित यांनी तब्बल 162521 मतांनी आपला विजय साकारला आहे. विश्वजीत नंतर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी 73169 मतांनी विजयी झाले आहेत. तर शिराळा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मानसिंग फत्तेसिंगराव नाईक यांनी 101933 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील तासगाव मधून 62532 प्रचंड मतदान घेऊन विजयी झाल्या. जत जागेवर काँगेसला यश मिळाले असून विक्रम सावंत 34379 मतांनी निवडून आले आहेत.

महायुतीला सांगली, मिरज,खानापूर विधानसभेच्या जागा जिकंण्यात यश मिळाले आहे. सांगली मतदारसंघातून सुधीर गाडगीळ 6939 मतांनी विजयी झाले तर मिरज मतदारसंघातून दगडू खाडे 30398 मतांनी विजयी झाले आहेत. त्याचबरोबर खानापूर मतदार संघातून शिवसेनेचे अनिल बाबर 26291 मतांनी विजयी झाले आहेत.

Leave a Comment