NCP Crisis । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजितदादांच्या ताब्यात दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर निवडणूक आयोगाने हा निकाल अजितदादांच्या पारड्यात टाकला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या निकालाचे मोठे राजकीय पडसाद सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यातच आता या निकालानंतर जर्द पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
‘जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा’ असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. भीड में रहकर भी तनहा कौन है, ये तो झुठे से झुठा भी बतादेगा सच्चा कौन हैं | भेडीयों की भीड में शेर आने दो, पता चलेगा जंगल का राजा कौन है ‘ असं म्हणत त्यांनी #sharadpawar लढेंगे और जितेगे असेही म्हंटल आहे. तत्पूर्वी आव्हाडांनी आणखी एक ट्विट केलं होते. शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब. याच नावासाठी लढत होतो, याच नावासाठी लढतोय,आणि याच नावासाठी लढत राहणार..! असं म्हणत आपली निष्ठा शरद पवारांपाशीच आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सूतोवाच केलं.
जो नाही झाला काकांचा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 6, 2024
तो काय होणार लोकांचा#सूर्याजी_पिसाळ
शरद पवारांना कोणतं नवं चिन्ह मिळणार? NCP Crisis
दरम्यान, निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर आज दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला पक्षाची तीन नवीन नावे आणि तीन नवी चिन्ह सुचविण्यास सांगितलं आहे. त्यामुळे पवार गटाकडून आज पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह सुचवलं जाणार आहे. शरद पवार गट उगवता सूर्य हे चिन्ह घेण्याची शक्यता आहे. हे चिन्ह घेऊन शरद पवार महाराष्ट्रात पुन्हा एकदा नव्याने आपला श्रीगणेशा करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाने (NCP Crisis) एक नवी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असं मोहीमेचं नाव आहे