हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यावर काल संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते उपस्थित होते.
या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत संजय राऊतांच्या लढाऊबाण्याचे कौतुक केले आहे. ‘शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत यांची शरद पवार साहेब, अजितदादा यांच्यासमवेत भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एका वर्षात दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली, तरी राऊत साहेबांचे हृदय मजबूत आणि वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच आहे’! अस धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. @rautsanjay61 यांची आदरणीय @PawarSpeaks साहेब, आदरणीय @AjitPawarSpeaks दादा यांच्यासमवेत भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एका वर्षात दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली, तरी राऊत साहेबांचे हृदय मजबूत आणि वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच आहे! pic.twitter.com/fEKdp3sKd9
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 6, 2020
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. अखेर संजय राऊत यांच्यावर बुधवारी लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी दोन स्टेन त्यांच्या हृदयात टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’