मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. खुद्द धनंजय मुडेंनी याबाबत माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
ट्विटरवर ट्विट करत ते म्हणाले, ‘तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे.’ असं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 10, 2020
शिवाय प्रकृती स्थिर असल्याचे सांगत उपचार घेवून लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल असं देखील ते म्हणाले आहेत. काही महिन्याआधी कोरोनाचा संसर्गामुळे धनंजय यांना लीलावतीमध्ये भरती करण्यात आलं होतं. उपचारानंतर कोरोनावर मत करत धनंजय मुंडे पुन्हा कामाला लागले होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in