राष्ट्रवादी मधील दत्तात्रय भरणे विरोधक गटाचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी। इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केलेल्या गटाने थेट भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनाच पाठिंबा जाहीर केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचा पाठिंबा देणाऱ्यांत समावेश असल्याने राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या पाच वर्षांत जगदाळे यांनीच हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील तालुका खरेदी विक्री संघासह कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादीकडे खेचून आणली होती.

जगदाळे यांनी गेल्या वेळी भरणे यांना पाठबळ दिल्याचे मानले जात होते. त्यामुळे यंदा त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीची अपेक्षा केली होती. मात्र, पक्षाने विद्यमान आमदार असलेल्या भरणे यांनाच उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या जगदाळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जगदाळे यांच्या समर्थकांनीही भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने त्याचा काही प्रमाणात पक्षाला फटका बसण्याची शक्यता होती. त्यानुसार सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वेगवाग घडामोडी घडल्या आणि बंडखोरी न करता थेट भाजपच्या उमेदवारालाच पाठिंबा देण्याचा निर्णय जगदाळे यांच्यासह त्यांच्या गटाने घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment