नारायण राणे म्हणजे गंजलेली तोफ ; जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

0
74
Narayan Rane Jayant Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार हे सक्षम असून यशस्वीपणे काम करत आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आराेप करत सुटले आहे. परंतु नारायण राणे हे गंजलेली ताेफ आहे. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गाेळ्यांना आम्ही महत्त्व देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टाेला लगावला आहे.

जयंत पाटील म्हणाले, भाजप नेहमीच वेगवेगळे स्टेटमेंट देऊन सरकार पडण्याच्या धमक्या देत असते. जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यात त्यांना यश मिळत नाही. संभ्रम निर्माण करणं हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे. सत्ता गेल्याचे दु:ख ते पचवू शकले नाही. त्यामुळे सरकारवर बेछुट आराेप करीत आहे. त्यांची सारी उठाठेव ही चर्चेत राहण्यासाठीच आहे. त्यांना विराेधी पक्षनेते पद किती गांभीर्याने घ्यावे लागते, याचा अनुभव नाही. त्यांनी अजून चार वर्ष ताे अनुभव घ्यावा, असा शेलक्या शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले होते नारायण राणे –

नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती.राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याची भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली. सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे देताहेत. मात्र हे स्वत:च पडणार आहेत, असे भाकितही नारायण राणे यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here