कटप्पाने बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर समजलं नाही पण टायगर अभी जिंदा है – जयंत पाटलांनी भाजपला फटकारले

Jayant Patil
Jayant Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलीच फटकेबाजी केली. कटप्पा को बाहुबली ने क्यू मारा हे समजलं नाही पण टायगर अभी जिंदा है अस म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच एकनाथ खडसेंवर अन्याय झाला, कटकारस्थान झाले असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत सुडाच राजकारण याच्या अगोदर कोणी केलं नाही. शरद पवार यांच्याकडून आम्ही महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण शिकलो. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत कोणीही सुडाचे राजकारण केलं नाही. पण मागील 5 वर्षांपासून भाजपने असले राजकारण चालू केल.खडसेसाहेबांवर अन्याय झाला, कटकारस्थानं रचली गेली असतील. खडसेंच्या अन्यायबाबत सर्वाधिक मीच बोललो असेल. मी सभागृहात प्रश्न विचारला होता, कटप्पाने बाहुबलीने का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है,असं जयंत पाटील म्हणाले.

देशात अनेक पक्ष आहेत पण कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणारा एकमेव पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. शरद पवार साहेब हे आपल्या पक्षाची खरी ताकद आहेत. पवार साहेबांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’