खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच त्यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे – जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे येथील भोसरी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झाली असून खडसेंना देखील आज ईडी चौकशी साठी बोलवण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करताना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच त्यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील म्हणाले, एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचा फार जुना राग असून खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिलं गेलं नाही. ओबीसी नेतृत्व असल्यानं त्यांना बाजूला करण्यात आलं. त्यांच्यावर ज्या प्रकरणी कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही.पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, अस जयंत पाटील यांनी म्हंटल.

खडसे यांनी राष्ट्रवादीत सन्मानानं प्रवेश दिल्यानं चिडून जाऊन भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. खडसेंना चुकीच्या पद्धतीनं अडकवत आहे. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment