केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? ; जयंत पाटलांचा मोदी सरकारवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?,” असा सवाल जयंत पाटील यांनी केला केला. जयंत पाटील यांनी ट्विट करत केंद्रावर निशाणा साधला.

शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?,” असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. जयंत पाटील यांच्या या ट्विटनंतर भाजपाने देखील आता प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. देशातील लोकांना आधी कोरोनाची लस द्या आणि मग जगभरात पाठवा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. भारतात लस नसली तरी चालेल, पण परदेशात पाठवा असं केंद्राचं धोरण आहे. केंद्र सरकार जगभरामध्ये लसींची निर्यात करण्यात आघाडीवर आहे. जगभरात विशेष म्हणजे पाकिस्तान जे आपले मित्र राष्ट्र आहे त्याला आपण लसीकरणाला मदत करत आहोत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment