संजय राऊत बोलले आणि वादळच आलं; जितेंद्र आव्हाडानी विरोधकांना सुनावले खडेबोल

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते यांनी एका मुलाखतीत बोलताना जागतिक आरोग्य संघटना व डॉक्टरांविषयी केलेलं वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्या विरोधात टीकेच रान उठवलं आहे. राऊत यांनी केलेल्या विधानाचे पडसादही राज्यभर उमटले असून डॉक्टरांसह अनेकांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संजय राऊत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. याच दरम्यान,राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड संजय राऊत यांची पाठराखण करत विरोधकांना खडेबोल सुनावलं आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत करोना परिस्थितीवर बोलताना जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा साधला होता. “जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झालीये,” असं राऊत म्हणाले होते. त्याचबरोबर डॉक्टरांविषयी राऊत यांनी विधान केलं होतं. या विधानावरून वाद उद्भवला असताना जितेंद्र आव्हाड राऊत यांच्या मदतीला धावून आले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून राऊतांवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. “जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं. संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. या विषयावर कोणीही बोलताना दिसलेलं नाही. संजय राऊत बोलले आणि वादळच आलं,” अशा शब्दात आव्हाड यांनी टीकाकारांचा समाचार घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here