हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे हे आपल्या दमदार भाषणशैलीसाठी ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र भर पायाला भिंगरी लावून दमदार प्रचारसभा घेणारे अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. थोडं मनन आणि चिंतनाची गरज असून काही दिवस कोणाच्याही संपर्कात राहणार नसल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. तसेच काही निर्णयांचा फेरविचारदेखील करणार असल्याचं सूचक विधान कोल्हे यांनी केलंय.
‘सिंहावलोकनाची वेळ. गेल्या काही दिवसांत, महिन्यात, वर्षात बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले. अनपेक्षित पावलंही उचलली. पण हे सगळं जुळवाताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळं जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक. शारिरीक थकवा आरामाने निघून जाईल, पण मानसिक थाकवा घालण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन,’ असं अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=5166407500042409&set=a.336631773020030&type=3
तसंच, ‘घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही. पुन्हा लवकर भेटू. नव्या जोमाने, नव्या जोशाने,’ असं सूचक वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे. या पोस्टममध्ये अमोल कोल्हे यांनी टीप लिहित फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, अशी मिश्किल टिप्पणीदेखील केली आहे.