हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना ईडीच्यावतीने अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना आज विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांची 6 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी ईडीकडून सांगण्यात आले की, अनिल देशमुख यांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली नसून त्यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर ईडी आणि सीबीआय कडून अनिल देशमुख यांनी चौकशी केली होती. काल रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयात हे प्रकरण गेले तेव्हा ईडीच्यावतीने महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आरोपी नसून त्यांच्यावर संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान आज झालेल्या विशेष न्यायालयाच्या सुनावणीत अनिल देशमुख यांना उच्च रक्त दाबाचा त्रास आहे, तसेच ह्दयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना कस्टडी देऊ नये, अशी मागणी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी केली. मात्र, न्यायालयाने अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली. 6 नोव्हेंबरनंतर अनिल देशमुख यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.