हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रासह पंजाबमध्ये कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी कापसाच्या दरासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.
सद्यस्थितीत राज्य सरकारकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल 6 हजार 380 असा दर निश्चित केला आहे. हा दर खूप कमी आहे. याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, अशी मागणी देशमुख यांनी पत्राद्वारे केली आहे.
शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल आणि पिकासंबंधी माहिती मिळवायची असेल तर हॅलो कृषी हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि सरकारी योजना, आपल्या पिकाच्या दराची माहिती घ्या. याव्यतिरिक्त Hello Krushi वर तुम्हाला बाजारभाव, हवामान अंदाज, सातबारा उतारा, जमीन मोजणी याबाबतची संपूर्ण माहिती अगदी मोफत मध्ये मिळते. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करून मोबाईल मध्ये Install करा. आणि वेगवेगळ्या कृषी योजनांचा आणि सरकारी अनुदानाचा लाभ घ्या.
Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here
सरकारनं जाहीर केलेली MSP शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन कापसाच्या दरात वाढ करावी अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
7 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची विक्री
केंद्र सरकारने कापसाची किमान आधारभूत किंमत निश्चित केलेली आहे. त्यामध्ये 6 हजार 380 रुपये ते 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये इतक्या दराने कापसाची विक्री केली जात आहे. एवढ्या दरात कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नसल्याने शेतकऱयाकडून कापूस विक्री थांबवली जात आहे. येत्या काही दिवसांत कापसाची मागणी वाढल्यास त्याचे दरही सुधारतील, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कापसाच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण
कापसाच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामागचे कारण म्हणजे अतिवृष्टी, पूर, परतीचा पाऊस होय. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. हाती आलेली शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त झाली होती. बिहार, झारखंडमध्ये पीके दुष्काळाच्या तडाख्यात सापडली होती. त्याचवेळी खरीप हंगामाच्या अखेरीस झालेल्या पावसाने कापसाबरोबरच भातशेतीच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.
क्विंटलमागे अधिक घट
या नैसर्गिक आपत्तीतून दिलासा मिळाल्यावर पिकांवर कीड रोगांचाही प्रादुर्भाव झाला होता. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. सध्या महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कापसाचे दर घसरले आहेत. क्विंटलमागे दोन हजार रुपयांहून अधिकची घट झाली आहे.