…कधी कधी लोकांना विनोद करायची हुक्की येते”; छगन भुजबळ यांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवनावरून भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपमधील नेत्यांनाही टार्गेट केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला. ” कधी कधी काही लोकांना विनोद करायची हुक्की येते,” असे टोला लगावताना भुजबळ यांनी म्हंटले आहे.

शिवसेना भवनबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सध्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार टीका केले जाऊ लागली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडूनही या प्रकरणी मत व्यक्त केले जात आहे. भाजप आमदार लाड यांच्या वक्तव्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी मंत्री भुजबळ यांच्याकडे विचारणा केली असता भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच आमदार लाड यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडवली.

मंत्री छगन भुजबळ यांच्या मनात आजही शिवसेना भवनबद्दल आपुलकीची भावना आहे. त्यांच्याकडून अनेकवेळा शिवसेनेच्या कार्यपध्दतीबद्दल कौतुकही करण्यात आले आहे. मंत्र, आज भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला कोण प्रसाद लाड? असा प्रतिप्रश्न केला. तसेच यावेळी लाड यांना भुजबळ यांनी आपल्या शैलीत टोलाही लगावला.