हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. करुन रेणू शर्माने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विरोधक देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. राष्ट्रवादीने मात्र त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. रेणू शर्मावर आणखी काही लोकांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांनी याआधी फेसबुक पोस्ट लिहून आपली बाजू मांडली होती.
रेणू शर्मावर हनिट्रॅपचा आरोप होत आहे. काही जणांनी रेणू शर्मा विरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. मात्र हे सगळं सुरू असताना धनंजय मुंडेंचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मैं जब जब बिखरा हुं, दुगुणी रफतार से निखारा हूं । मुंडेंच्या चाहत्यांनी ही या व्हिडिओला प्रचंड दाद दिली आहे.
दरम्यान रेणू शर्माच्या आरोपानंतर धनंजय मुंडे हे अडचणीत येतील असं वाटत असताना या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला. भाजप नेते यांच्या एन्ट्रीनंतर मुंडे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. शरद पवार यांनी देखील चौकशीनंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
तुमची इच्छा असेल तर मी माघार घेते
दरम्यान, मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार तरुणीही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. तिच्यावर केलेले सर्व आरोप तिने फेटाळले आहेत. तसेच ‘तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते’, असे ट्विट तिने केले आहे.‘मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का आले नाहीत? मला हटविण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’