हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे कामगार मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांना करोनाची बाधा झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांचा करोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आत्तापर्यंत राज्यातल्या सुमारे १५ ते १६ मंत्र्यांना करोनाची बाधा झाली त्यात आता दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश झाला आहे.
यासंदर्भात त्यांनी ट्विट करत म्हणल आहे की, नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून करोनाची चाचणी करून घ्यावी.
नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 29, 2020
राज्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून आता मत्र्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे अजित पवार, सुनील तटकरे तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. यापूर्वी धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’