मानलं पवार साहेब ,एका वाक्यात कान टोचले आणि कानफटीत पण दिली ; निलेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखाना स्वबळावर सत्ता मिळवण्याचे आवाहन केल्यानंतर स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसेनेचं वाक्य गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मानलं पवार साहेब, एका दिवसात वर्षभराची उतरून टाकली. एका वाक्यात कान टोचले, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

संदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट करून शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. मानलं पवार साहेब आपल्याला… महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानफटीत पण दिली, असं खोचक ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like