मुंबई । काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेतल्यांनंतर ते कोरोनामुक्त झाले होते. दरम्यान, दोन महिन्यांत त्यांनी आपली रक्त चाचणी केली. रक्त चाचणीचे अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर याबाबत माहिती दिली.
“मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसात मी रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहे,” असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी करत प्लाझ्मा दान करण्याची आपली इच्छा प्रकट केली.
मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला.आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातुन मी बराही झालो.मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे.येत्या दोन दिवसात मी हाॅस्पीटलमध्ये जावुन प्लाझ्मा डोनेट करणार आहे.#२४तासजनसेवेसाठी
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 17, 2020
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्लाझ्माची मागणीही वाढते आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त असल्याचं सिद्ध होत आहे. प्लाझ्माची मागणी लक्षात घेता दिल्लीतील Institute of Liver and Biliary Sciences (ILBS)मध्ये देशातील पहिली प्लाझ्मा बँक सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्ली सरकारने एलएनजेपी हॉस्पिटलमध्येही प्लाझ्मा बँक सुरु केली आहे. ओडिशा सरकारनेही प्लाझ्मा बँक सुरु केली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कटक येथील एसबीसी मेडिकल कॉलेजमध्ये प्लाझ्मा बँकेचं उद्घाटन केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”