हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज दसऱ्याच्या मुहूर्तावर अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठ्या भगवा ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही. सर्वांना एकतेचा संदेश द्यायचा आहे , असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भगव्या ध्वजाच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा दाखविला आहे. तब्बल 74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज आज फडकवण्यात आला. विशेष म्हणजे या ध्वजाचा आकार 96X64 फूट असून वजन 90 किलो आहे.
https://www.facebook.com/RRPspeaks/videos/466852057887747
देशातील 74 इतिहास आणि धार्मिक ठिकाणी या ध्वजाचे पूजन झाले असून 36 जिल्हे आणि 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास करून आज खर्डा येथे प्रतिष्ठापना त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने लोक दाखल झाले आहेत.