‘चंद्रकांतदादा, विचार करून बोला! नाहीतर …’ शरद पवारांचा बाप काढल्यावर शशिकांत शिंदेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘बाप’ काढल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली. “तुम्ही इतरांचे बाप काढता, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?” असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विचारला.

“चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपा ची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे?” असे ट्वीट शशिकांत शिंदे यांनी केलं होतं.

“चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी वक्तव्य करताना तारतम्य बाळगायला हवं होतं. हल्ली त्यांच्या वक्तव्यांमध्ये बेस नसतो. तुम्ही इतरांचे बाप काढणार, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का? कोणतंही वक्तव्य विचारपूर्वक करायला हवं, अन्यथा राष्ट्रवादीही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल” असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. (Shashikant Shinde warns Chandrakant Patil to think before commenting)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment